प्रा. एम्. पी. पाटील - लेख सूची

गीता-ज्ञानेश्वरीतील एक अनुत्तरित प्रश्न

‘ही भगवद्गीता अपुरी आहे’ हा प्रा.श्री. म. माटे यांचा एक महत्त्वपूर्ण लेख. ‘विचारशलाका’ या त्यांच्या ग्रंथात तो समाविष्ट केला गेला आहे. त्या लेखात भगवद्गीतेच्या पहिल्याच म्हणजे मुखाध्यायात अर्जुनाने उपस्थित केलेले दोन प्रश्न मांडले आहेतः(१) आप्तस्वकीयांच्या मृत्यूविषयीचापहिला चिरंतन स्वरूपाचा प्रश्न.आणि (२) कुलक्षयामुळे स्त्रियांमध्ये येणारी दूषितता, स्वैर आचारवत्यातून होणारावर्णसंकर हा दुसरा नैतिक, सामाजिक प्रश्न पहिल्या प्रश्नाचे उत्तर …

गीता – ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था

गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहिता, सामाजिक विषमतेवर आधारलेल्या जन्मजात वर्णव्यवस्थेचा निखालस पुरस्कार करणार्‍या आहेत. या दोन्ही संहितांमध्ये ठायीठायी आढळणारा या संदर्भातला पुरावा स्पष्ट आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांतील पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन या महाभारतकार व्यास यांच्या पात्राने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांमध्ये कुलक्षयानंतरचा स्त्रियांमधील स्वैराचार या नैतिक प्रश्नाबरोबरच त्यालाच जोडून येणारा …